Posts

आर जी कुलकर्णी सर

Image
"आर जी कुळकर्णी" जन्मदिवस-१२/०२/१९२९ मृत्यू- ३१/१२/२००८ आमच्या नववीच्या परीक्षेनंतर दहावीचे वर्ग चालू व्हायच्या आधी सरांनी गणितासाठी स्पेशल क्लास घ्यायचं ठरवलं.  अनिल डेग्वेकर, नितीन कुंभोजकर, मंजुषा देसाई ,अनुराधा गुणे , संदीप जनवाडकर, सरांचा मुलगा श्रीधर आणि मी असे थोडेसे हुशार समजले जाणारे विद्यापीठ हायस्कूलच्या 1980 च्या बॅचचे विद्यार्थी  सरांच्या घरी वरच्या मजल्यावर जमुन हे क्लास चालत. "मी दरवर्षी सर्व गणिताचा अभ्यासक्रम विसरून जातो आणि  शिकवताना  विषय पूर्णपणे जणू नवीन शिकवायचा असे चालू करतो "असे सर  सांगत होते.  आम्हाला वाटलं सर चेष्टा करत असावेत! सर मोठ्या तळमळीने शिकवायचे. वेद, उपनिषद्  ह्याच्यातल्या गोष्टी  सांगायचे .त्यांची अशी इच्छा होती की प्रत्येक सद्गुणावर उपनिषदात असलेले गोष्टीचा दाखला देऊन एक पुस्तक लिहायचे. उदाहरणात श्रावण बाळा चा आज्ञाधारकपणा, तसेच अरुणी नावाच्या  एका मुलाने शेतामध्ये बांधात  स्वतः झोपून पाणी अडवले होते..  अर्थात ही इच्छा पूर्ण झाली का नाही हे माहीत नाही, पण नन्तर झपाटल्यासारखे त्यांनी श्रीकृष्णावर  सव्यसाची नावाचे एक छान पुस्तक ल

"गो नी जोशी"

श्री. गो नी जोशी सर - चारुदत्त कुलकर्णी प्रास्तविक सरांचा आणि माझा संबंध 1977 ते 1980 पर्यत जास्त आला. ते आम्हाला विद्यापीठ हायस्कुल , कोल्हापूर येथे चित्रकला शिकवत असत. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात शालेय जीवनात येते आणि आपल्या जीवनावर खूप मोठा ठसा उमटवून जाते .आपल्याला ती काही उतराई करण्याची संधी देत नाही  किंवा मिळत नाही .लांबून पाहणाऱ्याला ती व्यक्ती जरी सामान्य वाटली तरी ती खूप असामान्य होती आणि तिच्या प्रतिभेला  योग्य तो न्याय मिळाला नाही  याचा सल आपल्याला सतत वाटत राहतो  .पण त्या व्यक्तीनेच तसे राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. विद्यापीठ हायस्कूलमधील चित्रकलेचे शिक्षक  श्री गो नि जोशी हे असंच एक अफलातून  व्यक्तिमत्त्व होते  .स्वत ची शैली असलेला एक असामान्य चित्रकार  ,ज्योतिषशास्त्राचे गाढे व्यासंगी  ,अफाट ताकद आणि चपळता असलेला एक अथलिट  ,घरची परिस्थिती चांगली नसताना कित्येक मुलांना शिक्षणासाठी आश्रय देऊन त्यांच्यावर प्रेम करणारा एक सहृदय माणूस  ,पंचवीस माणसे अंगावर धावून आले तरी त्यांना एकटा तोंड देऊ शकेल अशा निधड्या छातीचा माणूस असे त्यांचें काहीसे वर्णन करता येईल  . सरांच्या  कार

"इंगळे साहेब"

इंगळे साहेब       :चारुदत्त कुळकर्णी व्हल्कन दोन हजार साली चालू झाली हाेती . स्टील कास्टिंगज बाहेर डेव्हलप करण्याचा बराच प्रयत्न करून शेवटी असे लक्षात आले की स्वतःची स्टील फौंड्री चालू करण्याची आवश्यकता आहे.  तेव्हा काही चांगल्या स्टील फौंड्री बघण्याकरता मिश्रा साहेब आणि मी काही कंपन्यांना व्हिजिट केली.  त्यामध्ये  मॅग्ना कास्टिंग ही कंपनी कुणीतरी आम्हाला सुचवली होती. तेथे गेल्यानंतर ती फौंड्री आम्ही बघितली. तेथे फाउंड्री मॅनेजर असलेल्या इंगळे साहेबांना बघून मला थोडासा धक्का बसला.   भरदार दाढी, पांढरे स्वच्छ मागे भांग पाडलेले  केस, चष्मा आणि आवाज अगदी खोलवर विचार करून आल्यासारखा. प्रत्येक प्रश्नाला  त्यांनी उत्तरे दिली. एखाद्या  जुन्या ऋषिमुनीशी बोलतोय असे वाटत होते.  एकदा दहा पंधरा मिनिटे या माणसाशी बोलल्यानंतर त्यांना विसरणे शक्य नव्हते. त्या वेळी   एका सिल्वासाच्या मेटॅलर्गीस्टचा इंटरव्यू स्टील फौंड्रीसाठी झालेला  होता.जवळ जवळ फायनल झालं होतं.पण त्यांचे म्हणणे असे होते की त्यांना बराचसा सॅलरीचा पोर्शन टॅक्स लागणार नाही अशा स्वरुपात पाहिजे होता.  त्यामुळे मॅनेजमेंटला खूपच अवघड झाले ह

"टोळ साहेब"

टोळ साहेब   १९८७ मध्ये मी  B E मेटलर्जी रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग जयपूरमधून पास झालो .इचलकरंजीला एका छोट्या फौंड्रीत काम करताना कामासाठी पुण्यात आलो होतो.वडील योगायोगाने तिथे होते.ते म्हणाले चल आपण कमिन्स मदत तुला नोकरी मिळते का बघुया; मोहन टोळ आपल्या  चांगल्या ओळखीचे आहेत. त्याच दिवशी आम्ही दोघे संध्याकाळी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. साहेब फॅक्टरीतून घरी येऊन अंघोळ करून उकडलेल्या शेंगा खात बसले होते. फॅक्टरीतून आल्यानन्तर पहिल्यांदा ते आंघोळ करायचे.चट्ट्यापट्टयाची  अंडरवेअर आणि बनियन; गळ्यात जानवे.केस काळे कुळकुळीत,चोपडून भांग पाडलेला, देव आनन्द सारखा कोंबडा ! शेवटपर्यत त्यांचे केस काळेभोर आणि भांगाची स्टाईल तशीच होती! स्वयंपाकघरात  हाक मारून त्यांनी सांगितले  मु ज्या (माझ्या वडिलांचे नाव मुकुंद जनार्दन, हा त्याचा शॉर्ट फॉर्म) आला आहे त्याला पण शेंगा दे!आम्ही यावयाचे कारण सांगितले  , ते म्हणाले कमिन्स मध्ये तर सध्या शक्य नाही पण नगर रोडला प्लांट टू नावाची फौंड्री आहे तिथे त्याची काम करायची तयारी असेल तर होऊ शकतं  .त्या काळात कमिन्सचे फार मोठं ग्लॅमर होतं.तिथं जॉब मिळणं म्हणजे

"रामचंद्रन साहेब"

#कमिन्स मधील आठवणी  ~चारुदत्त कुलकर्णी     1.रामचंद्रन साहेब 2.कमिन्समधील सामाजिक(?/!) परिस्थिती   मी कमेंट्समध्ये एकोणिसशे सत्त्याऐंशी साली जॉईन झालो  .त्या वेळेला त्यावेळेला कमिन्समध्ये जॉईन होणं ही एक फार मोठी अचिव्हमेंट होती  .अश्या एखाद्या मोठ्या कंपनीत जॉइन होणं म्हणजे आयुष्याचा प्रश्न संपला असे त्या व्यक्तीचे आणि घरच्यांचे भावना असायचे. (भरपूर पैसे,चांगला फ्लॅट, सुन्दर बायको वै) त्यावेळी श्री आर व्हि रामचंद्रन साहेब हे मॅनेजिंग डायरेक्टर व श्री अरुण किर्लोस्कर साहेब हे चेअरमन  होते  .श्रीयुत रामचंद्रन साहेबांनी सर्व ट्रेनिजना सुरवातीलाच  एकदा ट्रेनिंग रूम मध्ये बोलावून अॅड्रेस केले होते  .प्रत्येकाने तुमचं करिअर प्लॅन द्या , तुम्ही मॅनेजिंग  डायरेक्टर पदापर्यंत कधी आणि कसे पोचणार, ह्याचा रोड मॅप तयार करा, असे काहीतरी बोलले. सगळ्यांना कमिन्ससमध्ये वाटचालीसाठी शुभेच्छा  .त्यानी खूप आपुलकीने गप्पा मारल्या  .प्रत्येक ट्रेनीने आपण मॅनेजिंग डायरेक्टर किंवा चेअरमन व्हावे अशा पध्दतीने आपलं करिअर मॅप करावा असे त्यांनी सांगितले होते  .तसेच आठ तास तुम्हाला काम करून कंटाळा येत नाही तर तुम्ह

" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"

#कमिन्स मधील आठवणी  ~चारुदत्त कुलकर्णी     अरुण किर्लोस्कर अरुणसाहेब/ASK अरुण किर्लोस्कर ऊर्फ अरुण साहेब हे बरेच वर्षे किर्लोस्कर कमिन्स चे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर असायचे.  खरे सांगायचे म्हणजे मी अरुण साहेबांबरोबर एकदाही बोललो नाही.  तीन चार  वेळ असताना भेटायचं लांबून बघायचा योग आला,  तेव्हा मी लांब राहून त्यांना शक्यतो टाळायचा प्रयत्न केला!  या भागातील सर्व माहिती ही ऐकीव माहितीवर किंवा गॉसिपिंग वर आधारित आहे !  अरुण किर्लोस्कर हे मूळचे कोल्हापूरचे असावेत  आमचे मित्र श्रीयुत मिलिंद नानिवडेकर यांच्या वडिलांचे ते लहानपणीचे मित्र ! नानिवडेकर वकील त्यांच्याशी अरे तुरे बोलायचे . मिलिंद हा त्याच्याच ओळखीने कमिन्स मध्ये लागला होता .  पर्सनल डिपार्टमेंट मधले श्री. विद्वान्स हे त्यांचे लहानपणचे मित्र असल्याचा दावा करीत .  ते मुंबईला एकत्र क्रिकेट खेळायचे लहान असताना, अशा काही गोष्टी होत्या .  बॉल कुणाच्या अंगणात गेला तर अरुण साहेब स्वतः तो आणायला जायचे, त्यावेळीसुद्धा ग्रुपमध्ये ते सगळ्यात  बोल्ड होते! मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!  तसंच प्लान्ट टू मधील सागर कुलकर्णी हा तरुण इंजिनिअर त्याच्याच

"डॉ मधुसूदन लाटकर"

शाळेतील आठवणी: (विद्यापीठ हायस्कुल , कोल्हापूर 1970-80) डॉ मधुसूदन लाटकर 12 सप्टेबर ६५ – ०१ जून १९९६ मदन हा माझा अतिशय जवळचा मित्र !.आमची मैत्री कशी जुळली आठवत नाही, पहिली ते दहावी आम्ही वर्गात  एका बाकावर बसायचो. आमचा उल्लेख चार्या लाटक्या असा व्हायचा.मी जवळजवळ रोज त्याच्या घरी जायचो.आमच्यात भांडण किंवा मतभेद कधीच झाले नाहीत,आमचा वर्गातील नंबर पहिल्या पाचात असायचा ,पण कधीही आमच्यात स्पर्धा नसायची.  त्याचे घर म्हणजे स्वरविलास नावाचा एक टूमदार वाडा होता. कपिलतीर्थ पंगू वाड्याजवळ.विशेष म्हणजे आतमध्ये शिरल्या शिरल्या डाव्या हाताला भरपूर पाणी असलेली विहीर होती.जवळच आजोबांची कॉट एका पडवीमध्ये असायची,आजी एकदम टीप टॉप, डोळ्यात काजळ, हातात घड्याळ, चार पायऱ्या वर गेले की डायनिंग टेबल आणि त्याला लागून स्वयंपाकघर.मध्ये छोटासा चौक,खाली दगडी फारशी, पहिल्या मजल्यावर सगळ्यांच्या बेडरूमस. त्यांचे आजोबा श्रीपाद लाटकर वकील होते.मूळचे चिखलीकर, आत्याने दत्तक घेतले होते.ते विद्यापीठस्तरीय फुटबॉल खेळाडू होते.अतिशय उमदे व्यक्तिमत्व. त्याच्या सर्व कुटुंबाला संगीताची खूप आवड होती.  विशेषतः नाट्यसंगीत .मदन पेटी