"डॉ मधुसूदन लाटकर"
शाळेतील आठवणी:
(विद्यापीठ हायस्कुल , कोल्हापूर 1970-80)
डॉ मधुसूदन लाटकर
12 सप्टेबर ६५ – ०१ जून १९९६
मदन हा माझा अतिशय जवळचा मित्र !.आमची मैत्री कशी जुळली आठवत नाही, पहिली ते दहावी आम्ही वर्गात एका बाकावर बसायचो. आमचा उल्लेख चार्या लाटक्या असा व्हायचा.मी जवळजवळ रोज त्याच्या घरी जायचो.आमच्यात भांडण किंवा मतभेद कधीच झाले नाहीत,आमचा वर्गातील नंबर पहिल्या पाचात असायचा ,पण कधीही आमच्यात स्पर्धा नसायची.
त्याचे घर म्हणजे स्वरविलास नावाचा एक टूमदार वाडा होता. कपिलतीर्थ पंगू वाड्याजवळ.विशेष म्हणजे आतमध्ये शिरल्या शिरल्या डाव्या हाताला भरपूर पाणी असलेली विहीर होती.जवळच आजोबांची कॉट एका पडवीमध्ये असायची,आजी एकदम टीप टॉप, डोळ्यात काजळ, हातात घड्याळ, चार पायऱ्या वर गेले की डायनिंग टेबल आणि त्याला लागून स्वयंपाकघर.मध्ये छोटासा चौक,खाली दगडी फारशी, पहिल्या मजल्यावर सगळ्यांच्या बेडरूमस.
त्यांचे आजोबा श्रीपाद लाटकर वकील होते.मूळचे चिखलीकर, आत्याने दत्तक घेतले होते.ते विद्यापीठस्तरीय फुटबॉल खेळाडू होते.अतिशय उमदे व्यक्तिमत्व. त्याच्या सर्व कुटुंबाला संगीताची खूप आवड होती. विशेषतः नाट्यसंगीत .मदन पेटी खूप छान वाजवायचा ,त्याचा धाकटा भाऊ अरविंद तबला वाजवतो.ते सर्व मिळून संगीत नाटके बसवायचे , मैफिली करायचे.ते एकत्र कुटुंब होते, धाकटे काका राजकाका United Western बँकेत होते. त्यांना नंदू आणि अश्विनी अशी दोन मुले आहेत.शरद काकांना अंजली आणि दोन मुली,धाकटे चंदुकाका बँक मॅनेजर,एकदम रॉयल, ते लांब लांब बदल्या मागून घ्यायचे. कलकत्ता वगैरे.बेबी आत्यांना दोन मुलं, आमच्या दोघांच्या कुटुंबात बराच सारखेपणा होता तीन काका,एक आत्या,सगळ्यात धाकट्या काकाच नाव चंदुकाका असणं ,प्रेमळ आजी आजोबा.
मदन अतिशय शांत मनमिळाऊ आणि प्रेमळ.कधी अंडे सुद्धा खाल्ले नाही,दारू तर दूरच.एकदा new palaceला शालीची ट्रीप गेली असताना नितीनने चेष्टेत त्याच्या डब्यात अंडे टाकले, तर त्याने काहीच खाल्ले नाही.
तो आजोबांचा अतिशय लाडका, त्यामुळे ते कोणत्याही ट्रीपला त्याला सोडायचे नाहीत.मेडिकलला गेल्यावर सुद्धा दर रविवारी घरी यावयाला लागायचे.
पाचवीत असताना मी त्याच्या इंलीश च्या पेपरची कोपी केली आणि मला १५/१५ मार्क पडले होते.घोरपडे सर होते शिकवायला.त्याच्या आधीच्या चाचणीत मला ३ मार्क पडले होते...त्याचे अक्षर अगदी मोत्यासारखे टपोरे आणि वळणदार होते.
आठवीत असताना त्याने वेड्यांचे हॉस्पिटल ह्या नाटकात काम केले होते.एरवी शांत असणारा मदन स्टेजवर गेल्यावर एकदम बोल्ड व्हायचा.तो एकदम हिरो सारखा वागायचा.तो एकपाठी होता; विशेतहा गाणी सगळी तो lyrics व चालीसकट मनातल्या मनात आठवू शकायचा.आणि विशेष म्हणजे तो कोणताही चित्रपट , त्याचा कोणताही भाग पाहून तो एन्जॉय करू शकायचा.
त्याच्या घरी पहिल्यांदा tv आला तेव्हा आजुबाजुची सर्व मंडळी संध्याकाळी पाच पासून ते रात्री दहा पर्यत जमायची.सगळे प्रोग्रॅम, आपली माती आपली माणस, सुद्धा मन लावून बघायची.रामायण ; गजरा ;छायागीत तर विचारू नका.
वर्गातली एका सुंदर मुलीची मोठी बहिण ; आणि त्याची काकू मैत्रिणी.ती त्यांच्या घरी चहा प्यायला जायची.त्यानंतर काही मुले लगेच त्यच्याकडे जायची. त्या मुलीच्या ओठांना स्पर्श झालेला कप ; आणि आपले ओठ ह्यांचा स्पर्श व्हावा ; हि एक त्यावेळची रोमांटिक कल्पना. ( तो मी नव्हे!; आता तो हयात नाही.)मदन सगळ्यांच्या बाबतीत खूपच cooperative होता.त्याचा शाळेतील एका मैत्रिणीच्या वर क्रश होता (अर्थात मनातल्या मनात), त्याने फक्त मला सांगितले होते.ह्या झाल्या शाळेतल्या गुलाबी रम्य गोष्टी ! वो कागज कि कश्ती...
MD झाल्यावर त्याच्या वागणुकीत आणि साधेपणात काहीही फरक पडला नाही. कॉलेज मध्ये असताना सुद्धा आई वडिलांसोबत महाद्वार रोडला फिरायला जाणारा तो एकमेव. माझा एका चांगल्या कंपनीतील पगार ५ हजार असताना त्याची practice महिन्याला ६० हजार होती.तो रविवारी सुद्धा काम करायचा.कार घेणे सहज शक्य असताना त्याने बजाज सुपर घेतली होती.त्याने स्वतःचे क्लिनिक चालू केले.
कालांतराने त्याने डॉ. स्मिता भट ह्या हुशार ज्युनियर मुली बरोबर प्रेमविवाह केला. ती स्त्री रोगतज्ञ होती. प्रेम सुद्धा त्याने विचार पूर्णं विचार करून केले होते. लवकरच त्यांच्या संसाराच्या वेलीवर ऐश्वर्या नावाचे गोड फुल उमलले.सर्व गोष्टी स्वप्नवत आणि सहजपणे चालू होत्या.
चांगली स्वप्न पटकन संपतात...मेहुण्याच्या लग्नाला जात असताना कर्नाटकात त्याच्या गाडीला अपघात झाला. मेहुणा ,मुलगी आणि तो जागेवरच मृत्यू पावले. त्याची पत्नी स्मिता कशीतरी वाचली. बातमी कळल्यावर अनिल आणि मी लगेच कोल्हापूरला घरच्यांना भेटायला गेलो होतो.त्याच्या घरच्या लोकांनी ,विशेषतः आई वडलांनी आणि आजीने खूपच संयमाने आणि धैर्याने परिस्थिती हाताळली. विशेष असे की प्रॅक्टिस चालू केल्यापासून पाहिल्यांदाचं मदनने ही सुट्टी घेतली होती!
मदनचे वडील श्रीकृष्ण तथा बाबासाहेब लाटकर शिवाजी युनिव्हर्सिटीत कामाला होते.VRS घेऊन त्यांनी नाट्य संगीताचे क्लासेस चालू केले होते.तसेच दर सोमवारी संदयाकाळी त्यांच्याकडे संगीतसभा भरायची. आईचे माहेरचे
नाव संजीवनी कुलकर्णी, आई वडिलांच्या प्रेम विवाह होता, ते लहान असताना एकमेकांच्या शेजारच्या वाड्यात रहायचे.ते दोघेही प्रेमळ, व्यवस्थित राहणी असलेले आणि आधुनिक विचारसरणीचे.वडिलांचे 11 जानेवारी 2020 मध्ये निधन झाले.
आई आता त्याचा धाकटा भाऊ अरविंद बरोबर,जो आता एक इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे, राहते आहे.
असे वाचले होते की यक्ष एखादी चूक करून थोड्या काळासाठीच पृथ्वीवर जन्म घेतात आणि कार्य संपले की लगेचच स्वर्गात निघून जातात! परमेश्वराने मदनला चिरशांती दिली आहे ह्याबद्दल मला मुळीच शंका नाही!
... चारुदत्त कुलकर्णी/ 22.10.20
P.S.
मदनच्या मिरज मेडिकल कॉलेज मधील सहकार्यांनी डॉ मधुसूदन लाटकर शिष्यवृत्ती M D ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी चालू केली.
लाटकर कुटुंबीयांनी झालेला आघात धैर्याने पचवला. अरविंद ने आई वडिलांची ,आजीची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली.घरात संगीताची उपासना पुढे चालू राहिली. मदनच्या आई वडिलांनी डॉ स्मिताला मुलीप्रमाणे मानून नवीन आयुष्य उभारणीसाठी पूर्ण सहकार्य केले.
सर्वांच्या सहमतीने तिने दुसरे लग्न केले, तिला परत मूल झाले आणि आता ती मिरजेला प्रॅक्टिस करत आहे. आपला नवरा,मुलगी आणि भाऊ गमावल्यानंतर तिने असामान्य धैर्याने परिस्थितीला तोंड दिले.
मला आयुष्याच्या क्षणभंगुरतेचि जाणीव झाली, आयुष्य चांगल्या पद्धतीने उपभोगल पाहिजे, शक्य असेल तेव्हा मनातील इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत असे मी ठरवले.मदन वर काहीतरी लिहावे ही खूप वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली !
Comments-
Manjusha: Charu, thank you so much for writing this. I got goosebumps while reading all these. Madan was a very silent, sweet and a good boy. He was very intelligent. In third grade, both of us went to write a scholarship exam on behalf of a boy who had an accident and broke his hand
Madhuri: I think Latkar's aunty(aatya) was staying in our society( R.K. Nagar) ..he used to come there...we all never forget him..he was very shy and sweet....
Majusha_One more memory is that Madhusudan was relative of one of my college friend's husband..she was also talking about Madhusudan and music which is common factor between them....
I too was his classmate from 1st to 10th grade. Him, Charu and I got a scholarship in the 4 th grade so we had a nice picture together. I cannot and never be able to forget Latkar in my life. 🙏🙏
Vivek Jathar.. Charu, this is very nice piece of information. He treated my mother when she was admitted to Ashok Bhupali hospital in 1991. It was my last meeting with him. Still we both remember him well
वो उनहे याद करे जिनहे भुलाया हो कभी।
ReplyDeleteहमने उनहे न कभी भुलाया न कभी याद किया।।
आठवणी दाटतात.......आठवणी कशा त्या? ज्या विसरता येणेच शक्य नाही, त्यांना आठवताच येत नाही, हेच खरे.
मदन बद्दल मला हेच म्हणावेसे वाटेल. या निमित्ताने त्या साठवणीत असलेल्या प्रसंगाची जुळवणी करून लिहित आहे. मदनचा विषय निघाला तर गप बसणे अशक्यच. त्यांचं आणि आमचं घराणं पिढयानपिढया जोडलेल.आमची घरं एकाच गल्लीत. .श्रावणातील गंगा गौर पाणवठ्यावरून आणायची असते .मी आणि ताई आईबरोबर लाटकर वाडयात जायचो.त्यांचया भलया मोठया वाडयातील आडावरून आमची गोोर घरी यायची.आमच्या गल्लीत खूप मुले मुली होती. सगळ्यांच्या घरातील पुस्तके जमवून आम्ही त्याच्या घरी एक सार्वजनिक वाचनालय सुरू केले होते .त्याचा चंदू काका आमच्या सगळ्यांचा मार्गदर्शक होता.वाचनालयातील पुस्तकांची देवाण घेवाण त्याचे रजिस्टर मेन्टेन कसे करायचे हे तो आम्हाला शिकवायचा .एका दिवाळीच्या सुट्टीत आमच्याकडून पूर्ण एक तासाचे एक बालनाट्य ही त्याने छानपैकी बसवून घेतले होते .हे सगळे आपण ५वी ते १०वीत होतो त्या काळामध्ये .लाटकर वाडयात संगीत , अभिनय,नृत्य पेटी,बासरी,सतार,तबला वादन अशा सर्व कला सुखाने नांदत होत्या नवहे पाणी भरत होत्या.
कालांतराने माझ्या वडिलांनी गावाबाहेर बंगला बांधला . नंतर मदन चाही परिवार आमच्या गल्लीतील ते घर सोडून गावाबाहेरच्या बंगल्यात राहायला गेला . पण कुटुंबांचा ऋणांनुबंध कायम राहिला.
आमच्या शाळा एकाच संस्थेच्या शाळा , १२वी झाली.आपण मेडिकल काँलेजमधे आलो.मदन हा एक अतिशय सज्जन सद्गृहस्थ म्हणजे thorough gentlemanहोता . लहानपणापासून आम्ही इतके जवळ होतो पण मदनने कॉलेजमध्ये माझ्याशी कधीही जादा सलगी किंवा आगाऊपणाने अधिक जवळीक दाखवणे असे कधीही केले नाही.
आता इतकया वर्षांनी आठवलं फर्स्ट इअरच आपलं कॉलेजचं गॅदरिंग होतं आणि बायो केम मायक्रोच्या मधल्या चौकात फिशपानडचा कार्यक्रम होता आणि त्याच्या नावाने मला पाँप पाँप पाँप पाँप टँकसी.माझया नवरयाने आणलिया मँकसी असा संगीत फिशपानड दिला होता.आपलया ' मिंटी ' एकांकिकेत आपण बरेचजण होतोच .
मग आपण सगळेच PG त बिझी झालो.तो स्मिता भटच्या प्रेमात पडला. रीतसर त्याचं लग्न झाल. त्याच्या घरचे पण सगळे खूप खूशहोते.बायको,मुलगी ,प्रॅक्टिस सगळं सगळं एकदम छान चाललं होतं . त्यादरम्यान मी एम. एस.होऊन वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलला चीफ सर्जन म्हणून जॉईन झाले होते . मदन भुपाळी हॉस्पिटलला ड्युटीवर असे. माझं घर आणि वालावलकर हॉस्पिटल यांच्यामध्ये त्यावेळी गवत मंडई मध्ये भुपाळी हाँसपिटल होते.मी बरेचदा संध्याकाळी त्यांच्याकडे जायचे आणि मग आम्ही गप्पा मारत बसायचो .
तो खूप समाधानी होता.त्याचं कुटुंब त्याची प्रॅक्टिस त्याच संगीत, नाटक हे सगळं खूप छान एन्जॉय करत होता.दिवस तुझे हे फुलायचे . .सखी मद् झालया तारका . .प्रथम तुज पाहता आणि अशी कितीतरी गाणी लागली की त्याची हटकून आठवण येते .
गिरिशने सांगितलं आहे तसच माझंही . .. .एम.बी.बी.एस.चा
दरवर्षी रिजल्ट मदनचे बाबाच मला कळवायचे .
माझंही लग्न झालं .मुंबईला काही वषे राहून मी परत पंढरपूरला प्रॅक्टिस सुरू केली.मदनची चुलत बहीण इथे पंढरपुरात बडवेनच्या कडेच लग्न होऊन आली. आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सगळ्या लाटकर कुटुंबाची माझी भेट झाली .
आणि अचानक एका रात्री मला एैनू कारंडेचा फोन आला.तुला कळंलं का ? ती महाभयंकर बातमी . . मला शोॉकच बसला.सुरेंद्र आणि सासरच्या इतर लोकांसमोर त्याच्या लहानपणीपासूनचया आठवणी सांगून रडून घेतलं .त्याच्यासारख्या उमद्या स्वभावाच्या माणसाची जगाच्या रंगभूमीवरूनच अचानक झालेली एकझिट मनाला पचवणं खूप अवघड झालं . आई, वडील ,भाऊ अरविद,आजी,चार काका,काकू दुःखात बुडाले.तो गेलयानतर आजी नव्वदी पार झाल्यानंतर मरणासन्न असताना मला मदन आता बोलावतोय असे म्हणत देवाघरी गेली. अलीकडेच वडीलही गेले.
इतकी वर्षे झाली तरी आपलया सगळयांकरताच मदन अजुनही एक सभ्य ,सदाचारी ,सच्चा सद्गृहस्थ . . खराखुरा, साधा माणूस ,संगीत सिनेमा नाटक सगळ्याच कलांचा छान आस्वाद घेणारा एक मित्र आठवणींच्या रुपाने अजरामरच आहे आणि राहणारही आहे.
...............डॉ वर्षा शिराळकर काणे