"रामचंद्रन साहेब"

#कमिन्स मधील आठवणी 
~चारुदत्त कुलकर्णी 


  
1.रामचंद्रन साहेब
2.कमिन्समधील सामाजिक(?/!) परिस्थिती  

मी कमेंट्समध्ये एकोणिसशे सत्त्याऐंशी साली जॉईन झालो  .त्या वेळेला त्यावेळेला कमिन्समध्ये जॉईन होणं ही एक फार मोठी अचिव्हमेंट होती  .अश्या एखाद्या मोठ्या कंपनीत जॉइन होणं म्हणजे आयुष्याचा प्रश्न संपला असे त्या व्यक्तीचे आणि घरच्यांचे भावना असायचे. (भरपूर पैसे,चांगला फ्लॅट, सुन्दर बायको वै)

त्यावेळी श्री आर व्हि रामचंद्रन साहेब हे मॅनेजिंग डायरेक्टर व श्री अरुण किर्लोस्कर साहेब हे चेअरमन  होते  .श्रीयुत रामचंद्रन साहेबांनी सर्व ट्रेनिजना सुरवातीलाच  एकदा ट्रेनिंग रूम मध्ये बोलावून अॅड्रेस केले होते  .प्रत्येकाने तुमचं करिअर प्लॅन द्या , तुम्ही मॅनेजिंग  डायरेक्टर पदापर्यंत कधी आणि कसे पोचणार, ह्याचा रोड मॅप तयार करा, असे काहीतरी बोलले. सगळ्यांना कमिन्ससमध्ये वाटचालीसाठी शुभेच्छा  .त्यानी खूप आपुलकीने गप्पा मारल्या  .प्रत्येक ट्रेनीने आपण मॅनेजिंग डायरेक्टर किंवा चेअरमन व्हावे अशा पध्दतीने आपलं करिअर मॅप करावा असे त्यांनी सांगितले होते  .तसेच आठ तास तुम्हाला काम करून कंटाळा येत नाही तर तुम्हाला वातावरणात त्याच त्याच काम केल्याने कंटाळा येतो असं काहीतरी ते बोलत होते  .हा माणूस खूप वेगळा आहे याची जाणीव मला त्या वेळेला झाली  .प्रत्येकाला ते आपल्या आपल्या बरोबरच्या समजून त्याच्या लेव्हलपर्यंत जाऊन गप्पा मारीत असत असे मला नंतर बऱ्याच लोकांकडून समजले  .अर्थात त्यावेळी आमच्या डोळ्यासमोरचे ध्येय म्हणजे  परमनंट व्हायचे याहून वेगळे काय नव्हते.त्यामुळे आम्हाला त्यांचे भाषण थोडेसे out of syllabus वाटले!!!

ते अतिशय रॉयल होते  .शॉपवर मॅनेजरला मॅनेजरना कधीतरी काम चांगले केले तर नेऊन बीअर पाजायचे  .तसंच कामगारांसाठी करीत कधी तरी सकाळी इडली चटणी किंवा इडली सांबार घेऊन घरातून घेऊन यायचे  .अॅग्रिमेंटमध्ये कामगारांच्या मागण्या ताबडतोब मान्य करायचे आणि पण त्यांच्याकडून काम जास्त होईल हे मान्य करून घ्यायचे  .मॅनेजर्सनासुद्धा  भरपूर पगारवाढ होईल हे ते बघायचे  .

आमच्या बॅचमधील श्रीधर तंबूळवाडळकर याने त्यांना एकदम एकदा कंपनीच्या गेट मध्ये  ओव्हरटेक थोडेसे विचित्र पध्दतीने केले  .तेव्हा मात्र ते वैतागले होते, त्याला  तेव्हा मात्र पर्सनल मॅनेजरला  सांगून त्याला चांगल्यापैकी दम दिला होता हे मला आठवते  .ते फक्त इंटरपर्यंत शिकले हाेते  .त्यांनी  काही मंडळी त्यांना इंटर राम असे म्हणत  .त्यांचे  इंग्रजी वाचन आणि वक्तृत्व अफाट होते  .हाऊस ऑफ डॉल्स त्यांचे एक आवडते पुस्तक होते  .त्यांची कनव्हिसिंग पॉवर खूपच जबरदस्त होते  .पुढे अमेरिकेत जाऊन त्यांनी काही क्वालिटीमध्ये डिग्र्या घेतल्या होत्या असे म्हणतात  .

त्यांचं स्वत चं गोल्फचा चेंडू तर करायचा एक कारखाना होता .ते  खूपच कलरफुल असे गृहस्थ होते आणि  खूपच रंगेल होते अशी त्यांच्याबद्दल ख्याती होती  .एकदा पैज लावून त्यांनी त्यांच्या साहेबांच्या सेक्रेटरीला स्वतःच्या स्कूटरवरून फिरायला नेले हाेते, ट्रेनिंगमध्ये असताना !
त्यांच्या रसिकतेविषयी अजूनसुद्धा कमिन्स मदत बऱ्याच आख्यायिका चघळल्या जातात !

त्यांची कंपनीवर ग्रीप एवढी होती की त्यांचा भाचा रवी वेंकतेशन पुढे कमिन्स चा चेअरमन झाला. तसेच त्यांचा मुलगा आता कमिन्स इंडिया ऑपरेशन चा सध्या हेड आहे! 

कमिन्स मध्ये पहिल्यांदा एक वर्षाचे रोेटेशनल ट्रेनिंग असे .  त्यानंतर बरीचशी मंडळी बाहेर पडत.  त्यानंतर  दोन वर्षे एक्स्टेंडेड ट्रेनिंग असे  त्यानंतर सहा महिने प्रोबेशनवर असत  .या सर्व चाळण्यातून पार झाल्यानंतर तो माणूस कन्फर्म होई. एकदा कन्फर्म झाल्यानंतर तो आयुष्यभर त्याला कसली ददात पडणार नाही याची सर्वाना खात्री असे.अर्थात खूप कमी मंडळी या सगळ्या टेस्टमधून पाहून कन्फर्म होत असत . 

आमचे एक स्नेही गमतीने म्हणत की  कमिन्स मध्ये चातुर्वर्ण्य सिस्टीम आहे  .मॅनेजरचे ए बी सी डी असे चार प्रकार होते  .मॅनेजर एम म्हणजे हे व्हाइस प्रेसिडेंट या लेव्हलचे असत त्यांच्याकडे काँटेसा व ड्रायव्हर असे  .ही लोकं हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असत  .

मॅनेजर बी म्हणजे डिपार्टमेंटल मॅनेजर हसत  .टोळसाहेब कन्फर्म झाले तेच मॅनेजर बी म्हणून.सर्वसामान्य इंजिनीअरच्या या दोन्ही पोस्ट विचाराच्या सुद्धा बाहेर असत.

इंजिनिअर  कन्फर्म झाल्यानंतर डायरेक्ट मॅनेजर डी म्हणून कामाला लागेल  .मॅनगर डी मध्ये 110, डी120,  ए 130,  डी 140 अशा चार ग्रेड्स होत्या  .सर्वसामान्य माणसाचे करिअर इथेच संपत असे  .म्हणजे समजा अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचे करिअर  .बरेचसे लोक हे ज्या ग्रेडला लागले त्याच ग्रेडला सुद्धा रिटायर होऊन यशस्वीपणे संसार करीत असत  .बऱ्याचशा  लोकांना आयुष्यात  एक किंवा दोन प्रमोशन मिळत असत जास्तीत जास्त !

मॅनेजर सीपर्यंत शंभर मधला  एखादा माणूस जाऊ शके. त्यासाठी त्याला  असामान्य हुशारी   किंवा असामान्य आज्ञाधारकपणा  किंवा तुमचा एखादा नातेवाईक जसे सासरेबुवा किर्लोस्कर ग्रुपमध्ये खूप वरच्या पोस्टला असणं,  तसेच नशिबाची साथ  या  गोष्टी आवश्यक असत .शक्यतो कऱ्हाडे किंवा कोकणस्थ लोक या लेव्हलला जात. कारण त्यांची पाहुणे मंडळी कोणीतरी याच्यापेक्षा वरच्या लेव्हलला असायची शक्यता असे  .

मॅनेजर सी या माणसाकडे स्वत ची गाडी असे  . सर्वसामान्य माणसाचं स्वप्न आपण रिटायरमेन्टपर्यंत मॅनेजर सी  व्हावे इथपर्यंतच असे.मॅनेजर सी या लोकांना सकाळी नऊ वाजता एक स्पेशल कॉफी मिळत असे  .त्यामुळे सर्वसामान्य मॅनेजर्सना त्यांचा खूप हेवा वाटेल  .बरेचसे डी मॅनेजर काहीतरी काम काढून नऊ वाजेच्या सुमारास साहेबांच्या समोर जाऊन बसत आणि कॉफीपानाचा आस्वाद घेत  .प्लान्ट टू चे सबनीस साहेब  यांच्यासारखे काही सहृदय मॅनेजर  थोडी  जास्त कॉफी आणायला सांगून पाठीमागच्या रूममध्ये ठेवायला सांगत,   मात्र तेथे आमच्यासारखेव काही लोक हे जाऊन गुपचूप कॉफी पिऊन येत असत,  त्याकडे त्यांना माहीत असूनही ते थोडासा कानाडोळा करत.  

कमिन्स मधले सर्वात सुखी कोण असे विचारले जाते वर्कर लोक असं म्हणता येईल .या लोकांचे आठ तासांची शिफ्ट असले तरी अॅक्च्युअल काम चार ते पाच तासांत संपत असे  .बरेचसे लोक कंपनीमध्ये येऊन अंघोळ दाढी करून कामाला लागत असत.  शिवाय संध्याकाळी जाताना ब्रेकफास्ट करून घरी जात असत.  त्यांना ओव्हरटाईम भरपूर मिळत असे आणि त्यांचा पगार मॅनेजर डी पेक्षा बराच जास्त जात असे.  ज्यांना जास्त ओव्हरटाइम मिळत नसे अशी लोके बाहेर जोडधंदे करून बरीच जास्त कमाई करत असत.  बरीचशी मंडळी संध्याकाळी  पाच ते आठ रिक्षा चालवत  त्यावर त्यांचा घरखर्च चालत असे व पगाराचे पैसे सेव्ह करून ते जमिनी घेऊन तिथे चाळी बांधत असत आणि त्या भाड्याने देत असत.  काही  लोकांची किराणा मालाची दुकाने होते. काही लोक हे क्लास घेत असत, काही लोक लायब्ररी चालवत असत.  या लोकांना कसलंही टेन्शन नसे. ह्यांचा जॉब सिक्युअर्ड असे.  एक माणूस कंपनीतच पाने तयार करून जेवणानंतर सगळ्यांना विकत असे  .बरेचसे लोक या उदबत्त्या वगरे असे अनेक पदार्थ  विकत असत  .बहुतेक सर्व मंडळी जेवणानंतर अर्धा तास आपापल्या जागी झोपत असत तसेच चहासुद्धा पंधरा मिनिटांच्या सुट्टीत पाच मिनिटे पिऊन दहा मिनिटं आपापल्या जागेवर  विसावा घेत असत.  काही लोक जाताना अंघोळ व दाढी करून जात असत आणि कंपनी बाहेरचा महत्त्वाचा वेळ वाचवत असत.

त्यानंतर स्टाफ ही एक  कॅटेगिरी हाेते.  ही लोकं धड वर्कर नाहीत ,धड म्यानेजर   नाहीत अशा लेव्हलला असत .याचा बराचसा वेळ मॅनेजर्स कसे काम  करतात ह्याचे मूल्यमापन करण्यात जाई. काही लोक भरपूर ओव्हरटाईम करून खूपच जास्त पगार मिळवत असत  .यामध्ये बरीचशी मंडळी बीएससी असत.अमुक अमुक मॅनेजरमध्ये आणखीन हे तमुक तमुक गुण असते तर तो फार चांगला मॅनेजर म्हणून झाला असता! आपला म्यानेजर  आपल्या लोकांसाठी काहीच मागू शकत नाही, मॅनेजमेंटकडुन, साधारण अशी त्यांची धारणा  असे. यांची युनियन असल्यामुळे त्यांचा जॉब सिक्युरिटी असे .एखाद्या इंजिनीअरची काही चूक झाली तर त्याची खिल्ली उडवणे  तसेच त्याने  पूर्वी काही चुका केल्या होत्या याची लिस्ट अपडेट ठेवणे  यात ही मंडळी अग्रेसर असत.आपल्यावर सारखं अतिशय अन्याय होतोय असा ते स्वत च एक सारखा समज करून घेत असत  .

Comments

Popular posts from this blog

" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"

"देवधर सर"