" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"
#कमिन्स मधील आठवणी
~चारुदत्त कुलकर्णी
अरुण किर्लोस्कर
अरुणसाहेब/ASK
अरुण किर्लोस्कर ऊर्फ अरुण साहेब हे बरेच वर्षे किर्लोस्कर कमिन्स चे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर असायचे. खरे सांगायचे म्हणजे मी अरुण साहेबांबरोबर एकदाही बोललो नाही. तीन चार वेळ असताना भेटायचं लांबून बघायचा योग आला, तेव्हा मी लांब राहून त्यांना शक्यतो टाळायचा प्रयत्न केला! या भागातील सर्व माहिती ही ऐकीव माहितीवर किंवा गॉसिपिंग वर आधारित आहे !
अरुण किर्लोस्कर हे मूळचे कोल्हापूरचे असावेत आमचे मित्र श्रीयुत मिलिंद नानिवडेकर यांच्या वडिलांचे ते लहानपणीचे मित्र ! नानिवडेकर वकील त्यांच्याशी अरे तुरे बोलायचे . मिलिंद हा त्याच्याच ओळखीने कमिन्स मध्ये लागला होता .
पर्सनल डिपार्टमेंट मधले श्री. विद्वान्स हे त्यांचे लहानपणचे मित्र असल्याचा दावा करीत . ते मुंबईला एकत्र क्रिकेट खेळायचे लहान असताना, अशा काही गोष्टी होत्या . बॉल कुणाच्या अंगणात गेला तर अरुण साहेब स्वतः तो आणायला जायचे, त्यावेळीसुद्धा ग्रुपमध्ये ते सगळ्यात बोल्ड होते! मुलाचे पाय पाळण्यात दिसतात! तसंच प्लान्ट टू मधील सागर कुलकर्णी हा तरुण इंजिनिअर त्याच्याच ओळखीने आला होता त्याच्या वडिलांचे आणि त्यांची ओळख होती.
अरुण साहेब स्वतः इंजिनीअर नव्हते , ते बीएस्सी किंवा बीकॉम असावेत . कमिन्स मध्ये यायच्या आधी ते किर्लोस्कर ऑइल एंजिन्समध्ये होते . तेथे वर्कर्स युनियन वर त्यांचा प्रचंड धाक होता ! त्यांना युनियन मिटींगला बोलताना ते चोर लोकानो चला मिटींगला वगरे असं बिंदास बोलायचे!
असं म्हणतात की अरुण साहेब म्हणायचे की आम्हाला इंजिनिअर नकोत गाढवे पाहिजेत आम्ही सांगू ते ऐकून काम करणारी!
तसंच एकदा अरुण साहेब इंटरव्ह्यू घेण्याकरिता गेले हाेते ,तेव्हा त्यांनी विचारले की तुमच्या तुकड्यांमध्ये पहिले दुसरे येणारे कोण लोक आहेत ? ते सगळे उभे रहा, त्यांना बाहेर जायला सांगुन आणि बाकीच्या लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांचे सिलेक्शन केले ! मशीनिंग साठी ( सीएनसी आणि व्हीएमसी मशीनवर बीएस्सी झालेले लोक घेण्याची आयडिया त्यांची! ) कारण टॉपर्स लोकं आपल्या कंपनीत टिकणार नाहीत याची त्यांना कल्पना होती .
तसेच एका ड्रायव्हरकडून अशी गोष्ट ऐकायला मिळाली की ड्रायव्हिंग करताना ब्रेक लावलेला त्यांना अजिबात खपत नसे. चुकून जर ब्रेक लागला तर ड्रायव्हरला पाठीमागून लाथ मारीत त्या काळातले सर्वच टॉपची माणसे अशा गोष्टी करायचे !
सबनिस साहेब एकदा म्हणाले होते की अरुण साहेब राहून घेताना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरच्या मशीनवर च्या लोकांना भयंकर झापायचे आणि शेवटी शेवटी मात्र फास्ट निघून जायचे आणि लोक कपाळावरचा घाम पुसून परत कामाला लागायची!
एकदा एक ऑपरेटर पाणी पिऊन झाल्यानंतर तंबाखू खात होता; त्याने एक छानपैकी पिंक जमिनीवर टाकली आणि समोर बघतोय तर समोर अरुण साहेब उभे राहून त्याला पाहत होते ! त्याला तेथेच लघुशंका झाली असे म्हणतात साहेबांनी त्याचा शर्ट काढून त्याला ते सगळे पुसून घ्यायला लावले...
अरुण साहेबांचे टेबल कायम स्वच्छ असायचे टेबलावर एकही कागदपत्र पडलेलं नसायचे नाट्यसंगीताचे त्यांना आवड होती एखादे पद गुणगुणत असायचे
ते पान खाणाऱ्या लोकांना त्या वेळेला फुलचंद पण नावे ठेवायचे पण नंतर स्वतः काही दिवस ते तसेच पान घ्यायचे
ते खूप कमी बोलत असावेत ते केस मागे सर्व केस मागे विंचरायचे आणि सोनेरी कसत काड्यांचा चष्मा घालायचे
माझ्या दृष्टीने त्यांचे कमिन्सला सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे CDSS स्थापना या दिलं सण डिस्ट्रिब्युटर सर्व्हिसिंग नेटवर्कमुळे कमिन्स अजून भारतात एक नंबरला आहे आणि कॅटरपिलर सारख्या जगातील बलाढ्य एक नंबर कंपनीला यशस्वीपणे टक्कर देऊन भारतात आपला अग्रस्थान टिकवून आहे
एकदा प्लान्ट तुला ते ट्रोल साहेबांच्या वर आले असताना त्यांनी सर्व सीनिअर सिनियर मॅनेजर्सना वर टेबलवर बोलावून घेतले व बोलताना ते म्हणाले की तुम्ही असं ऐकलं असेल के टोचणे माझं पटत नाही पण तसं काही अजिबात नाहीये मी उलट त्याला प्लांट प्लांट चालू करण्यासाठी संधी आणि पूर्ण मोकळा हात दिला आहे तेव्हा तो साहेब खुप इमोशनल झाले व आपले शूलेस बांधण्याकरता म्हणून टेबलखाली वाकले ते दोन मिनिटे तसेच थांबले.
Comments
Post a Comment