Posts

आठल्ये कुटुंब

 आठल्ये कुटुंब लहानपणापासूनच आमचा आठल्ये कुटुंबाबरोबर अगदी घनिष्ठ संबंध आला होता. डॉ. सुभाष आठल्ये मॉडर्न हायस्कूलमध्ये आमच्या बाबांच्या वर्गात होते. तसंच डॉ. शरद आठल्ये माझ्या काकांच्या अरविंद यांच्या वर्गात होते. त्याचप्रामणे माझे नंतरचे साहेब आणि गॉडफादर टोळ साहेब यांच्या वर्गात होते. पण त्यापेक्षा सगळ्यांत उत्साही आणि जिंदादिल म्हणजे त्यांचे वडील बाबा आठल्ये! हे आमच्या वडिलांचे खास मित्र. ते अनेकदा आमच्या घरी गप्पा मारायला येत असत. पांढरेशुभ्र कपडे, धोतर आणि कॅन्व्हासचे पांढरे पॉलिश केलेले शूज हा त्यांचा पोशाख असे. त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज असे. ते संघाचे कार्यकर्ते होते. बाबा आठल्ये मूळचे इस्लामपूरचे. त्यावेळेस ते मुंबईला जाऊन शिकून डॉक्टर झाले. तसंच त्यांनी एक्सरे संदर्भात कोर्स केला. त्यावेळेस एक्सरे टेक्नीक नव्याने आलं होतं. ते त्यातले स्पेशालिस्ट झाले होते. नंतर त्यांनी परत इस्लामपूरला येऊन स्वतः प्रॅक्टिस करायचं ठरवलं. त्यावेळेला इस्लामपूरमध्ये प्रस्थापित झालेले एक डॉक्टर त्यांना विरोध करत होते. त्यांनी त्यांना सांगितलं, ‘‘तू मुंबईला जा. मी तुला चिठ्ठी देतो. तुला चारशे र...

माधवराव नानिवडेकर - सुबोध प्रभू

 हे माझं नव लिखाण नम्रतापूर्वक सादर ------------------------------ माणसांबरोबर : बाबा नानीवडेकर डॉक्टर सुबोध प्रभू, कोल्हापूर बाबा नानिवडेकर म्हणजे मिलिंदचे वडील. प्रख्यात वकील होते. अतिशय बुद्धिमान. सुदैवाने त्यांचा माझा संबंध हळूहळू दृढ होत गेला त्याच्याबद्दल आज थोडे. बाबांची माझी पहिली भेट मी सातवीत असताना झाली. मिलिंद त्यावेळी गंगावेशमध्ये राहायचा. समोरच  दुधाळी तळ होतं. तिथे ढोकरी मासे पकडायला मी आणि मिलिंद एकदा गेलो होतो. बराच वेळ खेळून मिलिंदच्या वाड्यावर परत आलो तर मिलिंदमध्ये अमुलाग्र बदल! एकदम सज्जन, एकदम सालस मुलात त्याचं रूपांतर झालेलं! हे अचानक कसं घडलं? असा विचार करतोय तर मिलिंद चे आजोबा भेटले. चेहऱ्यावरच करारी मुद्रा होती. मी पण अवघडून गेलो. तेवढ्यात बाबा आले. शिडशिडीत बांधा, मिश्कील डोळे आणि  चेहऱ्यावर हास्य.माझी ओळख करून घेतली. वडील काय करतात? विचारल. "एलआयसी मध्ये आहेत* मी उत्तर दिलं. बाबांनी लगेच एलआयसीचे बोधचिन्ह हाताने तयार करून "म्हणजे लिव्ह इन कम्फर्ट" असा जोक मारला. त्याकाळी बँकेतली आणि एल आय सी नोकरी म्हणजे आरामाची समजली जायची. मला थोडं सात्विक स...

तात्या आजोबा -धवल रामतीर्थकर

 Menu Search कृष्ण धवल Life in Black & White TAGGED WITH DHAVAL RAMTIRTHKAR शिल्पकार मनांचे… तात्या आजोबा उर्फ कृष्णाजी कुलकर्णी कृष्णाजी  कुलकर्णी  उर्फ ‘तात्या’, हे माझ्या आईचे वडील आणि आमच्या पिढीच्या विचारांचे शिल्पकार. लहानपणीच्या ज्या सुखद आठवणी अजून मनात ताज्या आहेत त्या म्हणजे दर उन्हाळी सुट्टीत इचलकरंजीला तात्या आजोबांच्या घरी केलेल्या अनेक अद्वितीय करामती. दर सुट्टीत आम्ही सर्व भावंडं आजोबांनी खास विकसित केलेल्या दहा आसनी गाडीत बसून इचलकरंजीला मुक्काम ठोकायचो. इचलकरंजीच्या घरी पोहोचल्या क्षणापासून तात्या आजोबा आता काय काय नवीन आव्हाने समोर ठेवतील याची आम्ही आतुरतेने वाट बघत असू. मला अशी एकही सुट्टी आठवत नाही जेव्हा आजोबांनी आमच्या चिमुकल्या कल्पकतेला वाव देणारं काही जबरदस्त चॅलेंज ठेवलं नसेल. तात्या आजोबा म्हणजे नवनवीन कल्पनांचे एक चालते फिरते स्त्रोतच होते. तसं पहायला गेलं तर आई सांगते त्याप्रमाणे आजोबा तिच्या लहानपणी खूप कडक होते. त्यांच्या पुढे कोणीही काही बोलायला धजावत नसे. पण आमच्या साठी तरी तात्या आजोबा नेहमी एका खेळकर रहस्य कथेसारखे असायचे. घरापासून अ...

साळगांवकर

 Ramchandra Salgaonkar expired on 27th. Tatya aajoba cha  khas manus. वासांसि जिर्णानि यथा विहाय...  मृत्यू हा ज्यांचा अगदी सहज विषय असे बाबा काल 27 ऑगस्ट 2020 रोजी त्याचे बोट धरून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. कोणाच्याही विरहाने मला वेदना व्हाव्या नि त्यांनी वासांसि जिर्णानि हे गीतावचन ऐकवावे असे कित्येकदा झालेले... मनुष्य जीर्ण कपडे बदलून नवे घेतो तसे देहाचे वस्त्र जीर्ण झाले की आत्म्याला ते फेकून नवे घेण्याची आस लागते, त्यात वाईट ते काय? हे तत्त्वज्ञान ऐकायला ठीक असले तरी मनुष्याच्या कपड्याशी एकतर सहसा त्याचा एकट्याचाच संबंध आणि तो ही तुलनेने कितीतरी कमी काळाचा असतो. इथे हे वस्त्र आत्म्याला तो नर जन्मल्याक्षणापासून चिकटलेले, त्याचे सगळे राग-लोभ त्या कपड्याशी निगडीत आणि त्यामुळे इतरांचाही त्या कपड्याशी घनिष्ठ संबंध आलेला असतो. नवे कपडे घातलेले शरीर पाहता येते तसा आत्मा भेटत नाही ना... ही ती तुटल्याची वेदना... असो, पण जीव बोलला तसं वागला याबाबतीत... 14 ऑगस्टला फ़क्त आखडलेल्या गुडघ्यांना वाकतांना तोल संभाळता न आल्याने ते पडले आणि दंडाचे हाड मोडले. दुर्दैवाने पहिलीच नव्ह...

मधुमामा

 मधुमामा   *कमिन्ससारख्या मोठ्या कंपनीत आणि नंतर वल्कन टेक्नॉलॉजीसारख्या एका मल्टीनॅशनल कंपनीत जवळजवळ चाळीस वर्षं काम केल्यानंतर आणि बऱ्याच अनुभवांतून गेल्यानंतर असं जाणवलं की मधुमामाने आपल्याला कॉर्पोरेट लाईफबद्दल जसं सांगितलं ते सगळं अगदी १००% खरं होतं. पीटर ‌ड्रकर, जॉन केनेथ गिलब्रेथ इत्यादी नामांकित मॅनेजमेंट कन्सलटंट्‌सच्या गोष्टी मधुमामाने वाचल्या असणं काही शक्य नव्हतं. पण त्या सगळ्याचा अर्क त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येत असे. मधुमामा माझा दोन नंबरचा मामा! म्हणजे मनोहरमामानंतरचा मधुमामा आणि उल्हासमामा सगळ्यांत धाकटा. मधुमामाचा जन्म……………साली झाला. तसंच त्याचा मृत्यू………….साली झाला. अवघ्या……..वर्षांचं आयुष्य त्याला लाभलं. त्यात ठळकमानाने असं वर्गीकरण करता येईल की १९८२ पर्यंत म्हणजे त्याचा अपघात होईपर्यंत त्याच्या सक्सेसचा सरळसरळ वर जाणारा ग्राफ होता. त्याच्या अपघातानंतर मात्र लौकिकार्थने सक्सेसचा खाली जाणारा ग्राफ झाला. तो म्हणायचा, ‘‘कोणाचाही फायदा घ्यायला हरकत नाही; पण गैरफायदा मात्र कधी घेऊ नका. फायदा-गैरफायद्यातली सीमारेषा खूप पुसट असते. पण जो फायदा घेत असतो त्या...

मनोहरमामा

  मनोहरमामा   मनो ह रमा मा माझा सर्वात मोठा मामा . लहानपणी खूप बाळसेदारआणि देखणा  होता  आणि त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे मुलं शांत झोपावीत म्हणून दुधात थोडंसं अफू घालून त्यांना सांभाळायला ठेवलेल्या बायका झोपवत असत. मनो ह रमा मा ला पण तसं करायचे असं सांगतात .   म नो ह रमा माचं आणि आमच्या तात्याआजोबांचं अजिबात पटायचं नाही. त्याला विचारलं  असता तो म्हणायचा की , ‘‘ कुठल्या मोठ्या मुलाचं आणि वडलांचं  पट लं असेल ते मला दाखवा ,’’  आणि ते काही अंशी ख रं च हो तं .   इचलकरंजीला एकत्र कुटुंबात सर्व   जण बरेच व र्षं   राह त असत. मनो ह र मामाचं   काम म्हणजे तो दर रविवारी भाजी घेऊन येत असे .   भाजी इतकी असे की दोन - चार गडी माणसं दहा - वीस टोपल्या भरून घेऊन येत असे. त्याला भाजी आणायची फार आवड होती. मी   नंतर कधीच  कुठेच  एवढी भाजी आणलेली  बघित ले ली नाही. तसं च आम्ही लहान असताना मुलांना भेळ खायची असेल तर तो भेळीची सगळी गाडीच खरेदी करत असे. त्या माणसाला विचारे की ,   ‘ या सगळ्या गाडीची ,   मालाची किंमत काय ? ’ ...