आशिष भीडे चारुदत्त कुलकर्णी
*आशिष भिडे* 2023 मे च्या शेवटच्या आठवड्यात मी आशिषला जोशी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो . त्याची लिव्हर खराब झाली होती दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या . दाढी आणि केस खूप वाढलेले होते ,मी त्याला म्हणले अशिष तू लवकरच बरा होशील... त्याने हसून शांतपणे उत्तर दिले आता तसे काही वाटत नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक समृद्ध आणि कृतार्थ जीवन जगल्याचे समाधान होते. आधी जवळजवळ महिनाभर तो पुण्यात एका प्रसिद्ध हॉस्पिटलच्या ICU मध्ये ऍडमिट होता . आमची भेट झाल्यानंतर तीन-चार दिवसातच त्याचा मृत्यू झाला. त्या दिवसांमध्ये त्याने कंपनीतील आपल्या सर्व सहकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले, सगळ्यांशी मनमोरात गप्पा मारल्या, कामात सुधारणा कशी करता येईल याविषयी चर्चा केली. त्याच्या दृष्टीने त्याने शेवटचे सर्व दिवस अतिशय आनंदात घालवले. साधारण चार वर्षांपूर्वी त्याची एक क्रीटीकल सर्जरी यशस्वी झाली होती . त्याच्या वागण्यात परत पूर्वीचा जोश दिसू लागला होता. पण नंतर कोणाची दृष्ट लागली,कोण जाणे . सर्व कामांचा ताण स्वतःवर ओढवून घ्यायची त्याला सवय होती.... त्याची तब्येत ...